फिनिक्स ॲक्टींग स्कूल ही सर्वात उत्तम निवड आहे. फिनिक्स आपल्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यातील कौशल्ये वाढविण्याच्या दृष्टीने कार्य करते . ‘फिनिक्स’ मधील प्रशिक्षण प्रक्रिया मजेदार तशीच आव्हानात्मक आहे. खऱ्या अर्थाने ‘टॅलेंटेड’ अभिनेते आणि दिग्दर्शक संजय मोहिते आणि अभिनय व नाटयतंत्राची उत्तम जाण असणाऱ्या अभिनेत्री डॉ. राजश्री खटावकर या दोघांच्या अभिनय प्रशिक्षण सहवासात चांगल्या पध्दतीने तयार झालेल्या स्टाफला विद्यार्थ्यांमधील कौशल्य कशी वाढवावीत याची चांगलीच जाण आहे विद्यार्थ्यांना कसलीही अडचण येवू नये यासाठी प्रत्येक वर्ग उत्तम प्रकारे ‘डिझाईन’ केला गेला आहे. फिनिक्स विद्यार्थ्यांना अभिनयाच्या तांत्रिक शिक्षणासोबत व्यावहारिक आणि व्यावसायिक ज्ञानही देते .
आपल्याला जर असे वाटत असेल की, चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातही आपण मोठे होवू शकतो. तशी जिद्द, मेहनत करण्याची तयारी, प्रतिभा आणि काहीतरी करण्याची उत्कट इच्छा आपल्यामध्ये असेल तर तुम्हला तो प्लॅटफॉर्म ‘फिनिक्स’ देईल. तुमच्या पंखांना बळ मिळवण्यासाठी आणि तुमची सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ‘फिनिक्स ॲक्टींग स्कूल’ सर्वोत्तम पर्याय आहे.